PM Kisan Yojana: महाराष्ट्रात पीएम किसान योजनेतून 22.40 लाख शेतकरी वगळले, लगेच पहा संपूर्ण माहिती

PM Kisan Yojana: मोदी सरकार कडून पीएम किसान योजना राबवली जात आहे. या योजनेचे एकूण लाभार्थी 1.08 कोटीपेक्षा हे जास्त आहेत. या लाभार्थ्यांना दरवर्षी केंद्र सरकारकडून 6000 रुपये मिळतात. परंतु या योजनेमध्ये लाभार्थ्यांची संख्या अचानक कमी झाली आहे. आता सध्या लाभार्थ्यांची संख्या 85.60 लाखावर आली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र मध्ये चार वर्षाच्या कालावधीत तब्बल 22.40 लाखाने लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आहे.

 

तुम्हाला माहित आहे का ही झपाट्याने खाली आलेली संख्या का आली आहे. तर ही खाली आलेली संख्या म्हणजेच ज्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केले नाही, किंवा इतर निकष तपासल्यानंतर जे लाभार्थी निघाले आहेत ती संख्या कमी झाली आहे. कारण सरकारने असा निर्णय घेतला होता की ज्यांच्या आधार कार्ड बँक नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. परंतु अनेक लाभार्थ्यांनी या निर्णयाकडे लक्ष दिले नाही म्हणूनच लाभार्थी कमी झाले आहे.

या योजनेअंतर्गत 6000 रुपये 2000 च्या 3 समान हप्त्यांमध्ये देण्यात यायचे, परंतु आता जे लाभार्थी योजनेतून वेगळे आहेत त्यांना ही रक्कम देण्यात येणार नाही. महाराष्ट्रामध्ये ही संख्या 2020-21 मध्ये 1.08 कोटी होती. ती आता 2022-23 मध्ये 1.04 कोटीवर आली आणि त्याचबरोबर जुलै 2023 पर्यंत 85.40 लाखावर आले.PM Kisan Yojana

 

PM Kisan Yojana: महाराष्ट्रामध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत सर्वात जास्त लाभार्थी कोणत्या जिल्ह्यात आहेत ते खालील प्रमाणे.

  1. अहमदनगर मध्ये 5.17 लाख आहेत.
  2. सोलापूरमध्ये 4.54 लाख आहेत.
  3. कोल्हापूर मध्ये 4.06 लाख आहेत.
  4. बीड व पुण्यात 3.89 लाख आहेत.
  5. नागपूर मध्ये 1.50 लाख आहेत.
  6. नाशिक मध्ये 3.85 लाख आहेत.
  7. छत्रपती संभाजी नगर मध्ये 3.26 लाख आहेत.
  8. यवतमाळ मध्ये 2.77 आहेत. PM Kisan Yojana

Leave a Comment