Farmer loan scheme: पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने 3 लाख रुपये मिळणार..!! तेही फक्त 24 तासाच्या आत

Farmer loan scheme: शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही यापूर्वी पीक कर्ज घेतले असेल आणि ते पीक कर्ज तुम्ही वेळेवर भरले असेल तर अशा पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे व्याज आता शासनाने पूर्णपणे माफ केले असून त्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत डॉक्टर पंजाबराव देशमुख योजनाही राबविण्यात येत आहे.

 

सरकारकडून शेतकऱ्यांना 1 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंत तीन टक्के व्याजदराने कर्ज दिले जात आहे. मात्र, जर तुम्ही 2022-23 मध्ये तुमच्या नियमित घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड केली असेल तर अशा शेतकर्‍यांसाठी महाराष्ट्र सरकारने 232 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. Farmer loan scheme

यापूर्वी शासनाने 48 कोटी, 32 कोटी आणि 16 कोटींचे वाटप केले आहे. 24 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयात एकूण 118 कोटी रुपयांचा निधीही आज शासनाने मंजूर केला आहे.

 

महाराष्ट्रातील बहुतांश शेतकऱ्यांनी वेळेवर पीककर्ज भरले होते, मात्र त्या शेतकऱ्यांची व्याजमाफी सरकारने केलेली नाही. या पार्श्‍वभूमीवर, शासनाने 24 मार्च 2023 रोजी 118 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, त्यामुळे व्याजमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आणि इथून पुढे तुम्हाला सरकारकडून 3 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी पीक कर्ज दिले जाईल. त्यामुळे आता नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारकडून मोठा दिलासा मिळणार आहे, या योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.Farmer loan scheme

 

Farmer loan scheme

 

या योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment